विषारी साप असा ओळखता येतो का?

अनेकदा संदर्भ सोडून काढलेल्या नको त्या गोष्टी सोशल मिडीयावर समाजसुधारणेच्या नावाखाली फिरत राहतात आणि त्याने फायदा व्हायच्या ऐवजी गोंधळच जास्त होतो. असाच एक गोंधळ आहे विषारी साप कसा ओळखावा.  कुठल्यातरी दोन विशिष्ट सापांची तुलना केलेली इमेज ‘विषारी साप ओळखण्याच्या स्टॅण्डर्ड गाईडलाईन्स’ म्हणून फिरवली जातेय. त्याविषयीचं हे स्पष्टीकरण.
जगात विषारी सापांचे अनेक प्रकार आहेत. त्यांची शरीररचना, अधिवास, विषाचा प्रकार, दंश करायची पद्धत सगळंच प्रजातीनिहाय वेगवेगळं आहे. त्यामुळे अशा कुठल्याही एकाच फोटोतल्या ज्ञानाला मार्गदर्शन मानून त्यानुसार वागणं हे निश्चितच धोकादायक ठरू शकतं. आता ह्या फोटोत दिलेल्या विषारी सापाच्या विविध लक्षणांची तुलना इतर विषारी सापांसोबत करू.

१) फोटोच्या सुरूवातीलाच अ लिटिल एज्युकेशन नेव्हर हर्टस असं लिहिलंय. मी त्यात बदल करून असं म्हणेन, ‘ नॉट शुअर अबाऊट एज्युकेशन बट लिटिल ऑर मोअर, हाफ नॉलेज विल ऑलवेज हर्ट.’

२) पुढे त्यांनी सापाला पॉईझनस म्हटलंय. साप पॉईझनस आहे की व्हेनमस यावरही मी लिहिलंय ते तुम्ही http://blog.insearchoutdoors.com/2018/10/20/%e0%a4%aa%e0%a5%89%e0%a4%88%e0%a4%9d%e0%a4%a8-vs-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%ae/ इथे वाचू शकता.

३) विषारी सापाच्या डोळ्यांच्या बाबतीत म्हटलंय की त्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या उभ्या असतात. पण आपल्याकडे आढळणार्‍या नाग, मण्यार या जहाल विषारी सापांच्या डोळ्यांच्या बाहुल्या गोल आहेत.

४) पुढे त्यांनी म्हटलंय की विषारी सापांना नॉस्ट्रील पिट असतं. आता ही उष्णता संवेदक खोबण विषारी सापांपैकी फक्त पीट व्हायपर्स जातीच्या सापांमध्येच असते. उदा. आपल्याकडे आढळणारा बांबु पीट व्हायपर किंवा चापडा.
५) नंतर ते म्हणतात की शेपटीच्या खाली असलेले खवले अखंड असतात. पण नागाच्या शेपटीच्या खालचे खवले दुभाजीत असतात..
आता तुम्हाला लक्षात आलं असेल की अशीच कुठलीही इमेज बघून साप विषारी आहे की बिनविषारी हे ठरवणं किती धोकादायक असू शकतं.
म्हणूनच ध्यानात असू द्या की ‘लिटिल ऑर मोअर, हाफ नॉलेज विल ऑलवेज हर्ट.’

मकरंद केतकर.

2 Replies to “विषारी साप असा ओळखता येतो का?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *