-:कैसी जीभ लपलपाई:-

गंधज्ञान करून देणारी ही जीभच सापाचं प्रमुख साधन आहे. प्रत्येक वेळी जीभ फ्लिक केली की हवेतील गंधकण तीच्या दोन्ही टोकांना चिकटतात. जबड्यात गेल्यावर जीभ सापाच्या टाळूला असलेल्या व्होमेरो नेझल किंवा जेकबसन्स ऑरगनला चिकटते. तिथे ते गंधकण स्कॅन होतात आणि सापाला जवळपास नक्की काय आहे याचा पत्ता लागतो. हे गंधकण टिपण्याची जीभेची ताकद इतकी जबरदस्त असते, की अमेरिकेतील गार्टर सापातील नरांना अनेक किलोमीटर अंतरावरूनही प्रणयोत्सुक मादीच्या शरीरातून उत्सर्जित झालेल्या विशिष्ट रसायनांचा (फेरोमॉन्स) पत्ता लागतो.


मकरंद केतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *